छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar
नवे पोलीस आयुक्त (New Commissioner of Police) मनोज लोहिया यांनी पदभार(charge) घेतल्यापासून शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (cases of crime) प्रचंड वाढ (growth)झाल्याचे बातम्या प्रसिद्ध झाल्या असून या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पाच स्तरीय (Five levels) पेट्रोलिंगची योजना (Plan of patrolling) लागू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक व त्यावरील दर्जाचे तब्बल ५१ अधिकारी या पेट्रोलिंगमध्ये सहभागी होणार असून रात्रंदिवस विविध मार्गांवर तपासणी करण्यात येणार आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात २४ तास पोलिसांची गस्त असावी त्यादृष्टीने पाच स्तरीय पेट्रोलिंगची संकल्पना अंमलात आणण्याचा निर्धार केला. शनिवारपासून पाच स्तरीय पेट्रोलिंग योजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जनरल चेकिंग, झोनल चेकिंग, मुख्यालय पेट्रोलिंग, गुड मॉर्निंग पेट्रोलिंग आणि दिवसपाळी पेट्रोलिंग केली जाणार आहे. यामध्ये ५१ पोलिस अधिकारी नेमण्यात आले आहेत.
पाच स्तरीय पेट्रोलिंग
जनरल चेकिंगमध्ये रात्रगस्त दरम्यान अपघात, खून, जबरी चोरी, दरोडा, आग अशा प्रकारच्या घटना घडल्यास घटनास्थळी भेट देतील, झोनल चेकिंगमध्ये पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देतील. शहरात कुठे काही घटना घडल्यास अधिकारी तात्काळ घटनास्थळावर पोहचतील. गुड मॉर्निंग पेट्रोलिंग शहरातील संवेदनशील ठिकाणे, धार्मिक स्थळे, महापुरुषांचे पुतळे याठिकाणी भेटी देतील. तर दिवसपाळीची चेकिंग दिवसभर विविध ठिकाणी तपासणी करतील.
नागरिकांनी सहकार्य करावे
शहरवासीयांनी दक्ष नागरिक, सुरक्षित परिसर व 'आपला शेजारी, खरा पहारेकरी' ही संकल्पना राबवावी व पोलिसांना सहकार्य करावे. संकटसमयी नागरिकांनी डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मदत घ्यावी. त्यांच्यासमोर घडत असलेल्या घटनेची, गुन्ह्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.