Monday, April 29, 2024
HomeUncategorizedआता शेतकऱ्यांना मिळू शकणार वर्षकाठी ५० हजार!

आता शेतकऱ्यांना मिळू शकणार वर्षकाठी ५० हजार!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

कृषिपंपांना (agricultural pump) दिवसा नियमित व भरवशाचा वीजपुरवठा देणार्‍या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राज्य शासनाने जाहीर केला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सौर प्रकल्प (Solar Project) उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ३३ केव्ही उपकेंद्रापासून १० किमीपर्यंतची सरकारी जमीन तर ५ किमीपर्यंतच्या खासगी जमिनीची महावितरणला गरज आहे. खासगी जमिनीसाठी शेतकर्‍यांना पूर्वी एकरी ३० हजार दिले जात होते. त्यात आता वाढ करून ५० हजार वार्षिक भाडे देण्यात येणार आहे. 

- Advertisement -

शासकीय जमीन देणाऱ्या ग्रामपंचायतींनाही १५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शेतकरी व ग्रामपंचायतींनी जागा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले आहे. सौर प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज कृषिपंपांना दिवसा दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रात्री-अपरात्री सिंचनासाठी शेतात जाण्याचा त्रास वाचणार आहे, असे सौर प्रकल्प छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातही उभारण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे.

मात्र, महावितरणला या प्रकल्पासाठी जितकी जमीन हवी त्यापैकी केवळ १० टकके जमीन सध्या उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तसेच ग्रामपंचायतींनी जमीन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. या जमिनीसाठी शेतकऱ्यांना दखर्षी ५० हजार प्रतिएकर भाडे देण्यात येणार आहे. यात दरवर्षी ३ टक्के वाढ देण्यात येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी पूर्वी १० हजार रुपये असलेले प्रक्रिया शुल्क आता केवळ एक हजार करण्यात आले आहे. 

या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला हातभार लागणार आहे. या योजनेत सहभागी होऊन आपली जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar_mskvy/index_mr.php या संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या