आता दररोज औरंगाबाद-दिल्ली, मुंबई उड्डाण

एअर इंडियाचा पुढाकार
आता दररोज औरंगाबाद-दिल्ली, मुंबई उड्डाण

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना (Corona) संसर्गकाळात आठवड्यातून पाच दिवस उड्डाण करणारी (Air India) एअर इंडियाची दिल्ली आणि मुंबई विमानसेवा (Delhi, Mumbai Airlines) आता दररोज उड्डाण घेणार आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या विमान प्रवाशांच्या सुविधेत मोठी भर पडली आहे.

आठवड्यातून पाच दिवस एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली आणि दिल्ली-औरंगाबाद-मुंबई विमानसेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांत विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे एअर इंडियाची दिल्ली आणि मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस उड्डाण घेणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com