Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआता हजार लिटर पाण्याला मोजा १४३ रुपये!

आता हजार लिटर पाण्याला मोजा १४३ रुपये!

औरंगाबाद – aurangabad

शहरात मुख्य वितरिकेवरील सुमारे दीड हजार बड्या ग्राहकांना रोज बारा तास (Water) पाणी मिळते. त्यांच्या या अमर्याद पाणी वापरला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Municipal administration) वॉटर मीटरचा पर्याय निवडला आहे. या ग्राहकांच्या नळांना वॉटर मीटर लावले जाणार असून त्यांना हजार लिटर पाण्यासाठी १४३ रुपये या दराने पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे.

- Advertisement -

तीन महिन्यांपासून शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अनेक बसाहतोंमध्ये सहा ते सात दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो आहे, पण बड्या ग्राहकांची मात्र चंगळ सुरू आहे. ही चंगळ थांबवून, पाणी वापर मर्यादित करण्यासाठी आता त्यांच्या नळांना मीटर बसविले जाणार आहेत. प्रभारी महापालिका आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी त्याबाबतचे आदेश दिले. त्यानंतर मनपा प्रशासन लगेचच कामाला लागले आहे.

आता प्रत्येक प्रभागात बड्या ग्राहकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे, मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नळाला मीटर लावल्यानंतर त्यांना वार्षिक ठोक पाणीपट्टी आकारली जाणार नाही. त्याऐवजी त्यांना पाणी वापरानुसार मासिक किंवा त्रैमासिक बिल दिले जाईल. या पाणीवापरासाठी हजार लिटरला १४३ रुपये असा दर राहील, त्यामुळे बड्या ग्राहकांना महिन्याला सरासरी दोन ते तीन लाख रुपये बिल आकारले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले,

महापालिकेकडे पाच हजार मीटर

समांतर जलवाहिनी योजनेच्या ठेकेदार कंपनीने त्यावेळी ५ हजार मीटरची खरेदी केली होती. मात्र, त्यावेळी नागरिकांच्या विरोधामुळे नळांना मीटर बसविण्याची मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. पुढे समांतरचा करार रद झाल्यावर त्या कंपनीकडील मीटरचा साठा मनपाने स्वत:च्या ताब्यात घेतला. ते मीटर अजूनही मनपाकडे पडून आहेत. आता तेच मीटर बड्या व्यावसायिक ग्राहकांच्या नळांना बसविले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या