आता महापालिकेच्या सर्व सेवा एका क्लिकवर!

छत्रपती संभाजीनगरात नवा प्रयोग
आता महापालिकेच्या सर्व सेवा एका क्लिकवर!

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


स्मार्ट सिटी (Smart City) मार्फत महापालिकेच्या (Municipality) सेवा पुरविण्यासाठी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा दिली जाणार आहे. एकाच पोर्टलच्या ऍपद्वारे महापालिकेच्या विविध सेवा आता एका क्लिकवर मिळणार आहेत. सुरुवातीला ५ ते ६ सेवा ऑगस्टपासून सुरू केल्या जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्‍त जी. श्रीकांत यांनी दिली.

शहरातील नागरिकांना विविध कामांसाठी महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीदेखील त्यांची कामे होत नसल्याने मनपाबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्‍त होतो. मनपाची प्रतिमा खराब होऊ नये, नागरिकांना घरबसल्या सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिकेच्या सेवा आणि सुविधा ऑनलाईन करण्यावर आता भर दिला जात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्सची योजना राबविली जात आहे. ई-गव्हर्नन्सद्वारे नागरिकांना पोर्टलच्या ऍपद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासोबतच जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, स्मार्ट बसची सुविधा, कचरा घेऊन जाणारी घंटागाडी, आरोग्य सुविधा, बीपीएमएसद्वारे बांधकाम परवानगी, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऑनलाईन सुविधा दिली जाणार आहे.

प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिकेच्या सेवा-सुविधा ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. घरबसल्या नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अर्ज कसा करावा, त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत, अर्ज पाठविल्यानंतर पाठपुरावा कसा करावा याची माहिती देण्यात येईल. एका क्लिकवर या सेवा मिळतील. पाच ते सहा सेवा ऑगस्टपासून सुरू केल्या जातील. एकाच ऍपद्वारे मनपाच्या सर्व सेवा-सुविधा प्राप्त करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com