Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुलांनो, अभ्यास करा, कष्टाची तयारी ठेवा, मोठे व्हा!

मुलांनो, अभ्यास करा, कष्टाची तयारी ठेवा, मोठे व्हा!

औरंगाबाद – aurangabad

मुलांनो, आई-वडील कष्ट घेवून तुमचा सांभाळ करत आहेत. तुम्ही भरपूर अभ्यास करा, प्रामाणिक कष्टाची तयारी ठेवा आणि मोठे माणूस होवून त्यांचे पांग फेडा, असा संदेश ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे याने झोपड्या करून राहणाऱ्या गरीब, वंचित कुटुंबातील चिमुकल्यांना दिला. त्याला होकार देत चिमुकल्यांनी दोन तास धमाल मजा केली. मुलांची झुकझुक गाडी वस्तीतून फिरली, ऊंच उडया मारल्या आणि गाण्यांवर मनसोक्त नाच केला. मनाजोग्या खेळण्या आणि खाऊ मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.

- Advertisement -

निमित्त होते १३ नोव्हेंबर रोजी येणारा जागतिक दयाळू दिन आणि १४ नोव्हेंबर रोजीचा बालदिन. आस्था जननविकास संस्थेच्या वतीने या दोन दिवसाचे औचित्य साधत चिमुकल्यांना अनपेक्षित भेट दिली. बीड बायपास रोडवर सुमारे १५० कुटूंब वर्षानवर्षे झोपड्या करून राहत आहेत. पालक मजुरी, ऊसतोडणी, मजुरी करतात. तर येथे राहणारी १०० हून अधिक मुले शाळेत जात नाहीत. ते रस्त्यावर भीक मागतात. यामुळे ‘आस्था’ त्यांच्या आयुष्यात एक दिवस आनंदाचा आणण्याचे ठरवले.

…अन् चार्ली अवतरला

शनिवारी आस्थाचे स्वयंसेवक हॉटेल निशांत पार्कसमोरील या झोपड्यांमध्ये पोहोचले. आस्थाच्या अध्यक्षा डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी मुलांना एका जागेवर बसवून बालदिनाचे महत्त्व, शिक्षणाची गरज, आरोग्याच्या चांगल्या सवयी याची माहिती दिली. तेवढ्यात टाईट कोट, ढगळी पॅन्ट, छोटी हॅट, भलेमोठे बुटं आणि छोटीशी मिशी असणारा ज्युनिअर चार्ली अवतरला आणि मुलांमध्ये उत्साह पसरला. चार्लीने मुलांना अभिनयातून चांगले जगण्याचा संदेश दिला. पुढे तासभर मुलांनी त्याच्यासोबत वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला. काही मुलांनी गाणे गायले, जोक्स सांगीतले. मनसोक्त नृत्य केला. खाऊ आणि खेळण्यांच्या भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आस्था’च्या अध्यक्ष डॉ. आरतीश्यामल जोशी, जोत्स्ना पुजारी, मथुरा मेवाड, मंजुषा माळवदकर, प्रा.विद्या पाटील, अनुराधा कामत, यामिनी आसर, डॉ.चारूलता रोजेेकर, अॅड. गीता देशपांडे, विजय रणदिवे, संजय बरिदे, पाटणकर, अभिजित बागूल, शशांक तांबोळी, खुशी पाटील, जयप्रकाश जोशी, अनंत काळे, ज्योती करमासे यांनी सहकार्य केले.

आस्था जनविकास संस्थेने दुर्लक्षित, आर्थिकदृष्टया मागास कुटुंबातील मुलांसोबत बाल दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील पैठण रोड जवळील भागात मजूर, ऊसतोड मजूर, मातीकाम करणाऱ्या श्रमजिवी कुटुंबाच्या झोपड्या आहेत. येथील मुलांना बालदिनानिमित्त चार्ली चॅपलिनच्या वेषातील कलावंतासह धमाल करण्याची संधी संस्थेने दिली. चार्लीचे अनोखे रूप मुलांना मनसोक्त हसवून गेले. चार्लीच्या हावभावाने आणि गमंती जमंतीने मुले आनंदात न्हावून निघाले. काही मुलांनी चार्लीला घोडा करत त्यावर बसण्याचाही आनंद घेतला. तर चार्ली सोबत रेल्वेगाडी ही केली. काही मुलांना चार्ली सोबत नृत्य करण्याचा आनंद घेतला. यावेळी मुलांना खाऊ व भेटवस्तू म्हणून खेळणे ही देण्यात आले.

संसाराचे गणित जुळवताना या कुटुंबाची कसरत होते. यामध्ये मुलांचे बालपणही होरपळते या कुटुंबातील मुलांना आयुष्यातही बालदिनाचा आनंद मिळवा यासाठी आस्थाच्या सदस्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी येथील काही मुलांनी गाणे गायले,कथा सांगितल्या. मुलांना बालदिन साजरा का केला जातो आणि चाचा नेहरूंची माहिती ही देण्यात आली.नमी

निमित्त होते १३ नोव्हेंबर रोजी येणारा जागतिक दयाळू दिन आणि १४ नोव्हेंबर रोजीचा बालदिन. आस्था जननविकास संस्थेच्या वतीने या दोन दिवसाचे औचित्य साधत चिमुकल्यांना अनपेक्षित भेट दिली. बीड बायपास रोडवर सुमारे १५० कुटूंब वर्षानवर्षे झोपड्या करून राहत आहेत. पालक मजुरी, ऊसतोडणी, मजुरी करतात. तर येथे राहणारी १०० हून अधिक मुले शाळेत जात नाहीत. ते रस्त्यावर भीक मागतात. यामुळे ‘आस्था’ त्यांच्या आयुष्यात एक दिवस आनंदाचा आणण्याचे ठरवले. …अन् चार्ली अवतरला शनिवारी आस्थाचे स्वयंसेवक हॉटेल निशांत पार्कसमोरील या झोपड्यांमध्ये पोहोचले. आस्थाच्या अध्यक्षा डॉ.आरतीश्यामल जोशी यांनी मुलांना एका जागेवर बसवून बालदिनाचे महत्त्व, शिक्षणाची गरज, आरोग्याच्या चांगल्या सवयी याची माहिती दिली. तेवढ्यात टाईट कोट, ढगळी पॅन्ट, छोटी हॅट, भलेमोठे बुटं आणि छोटीशी मिशी असणारा ज्युनिअर चार्ली अवतरला आणि मुलांमध्ये उत्साह पसरला. चार्लीने मुलांना अभिनयातून चांगले जगण्याचा संदेश दिला. पुढे तासभर मुलांनी त्याच्यासोबत वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला. काही मुलांनी गाणे गायले, जोक्स सांगीतले. मनसोक्त नृत्य केला. खाऊ आणि खेळण्यांच्या भेट देऊन कार्यक्रमाचा समारोप  झाला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी ‘आस्था’च्या अध्यक्ष डॉ. आरतीश्यामल जोशी, जोत्स्ना पुजारी, मथुरा मेवाड, मंजुषा माळवदकर, प्रा.विद्या पाटील, अनुराधा कामत, यामिनी आसर, डॉ.चारूलता रोजेेकर, अॅड. गीता देशपांडे, विजय रणदिवे, संजय बरिदे, पाटणकर, अभिजित बागूल, शशांक तांबोळी, खुशी पाटील, जयप्रकाश जोशी, अनंत काळे, ज्योती करमासे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या