Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedमुंबई प्रवासासाठी 'जनरल' तिकीट मिळेना

मुंबई प्रवासासाठी ‘जनरल’ तिकीट मिळेना

औरंगाबाद – aurangabad

कोरोना (corona) काळात सामान्य रेल्वेला (Special train) विशेष रेल्वेचा दर्जा देऊन आरक्षित प्रवाशांसाठी रेल्वे सेवा चालविण्यात आली. विशेष रेल्वेचा दर्जा काढून सामान्य रेल्वे पुन्हा करण्यात आलेली आहे. मात्र, सामान्य रेल्वेतून सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावर अजूनही बंदी कायम आहे. औरंगाबाद मार्गावरून (mumbai) मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत जनरल तिकीटांची विक्री करण्यात येत नाही. यामुळे (General ticket) जनरल तिकीटावर मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हाल अजूनही सुरू आहे.

- Advertisement -

औरंगाबाद रेल्वे मार्गावर सध्या २३ रेल्वे धावत आहेत. लॉकडाउनपूर्वी धावणाऱ्या रेल्वेच्या संख्येपेक्षा ही संख्या कमी आहे. मात्र महत्त्वाच्या सर्व रेल्वे धावत आहेत. मुंबई मार्गावर औरंगाबादहून राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, देवगिरी आणि नंदीग्राम एक्स्प्रेस चालविल्या जातात. त्यातून प्रवास करण्यासाठी आता सामान्य दरात आरक्षण तिकीट घ्यावे लागत आहे.

यापूर्वी या सर्व रेल्वेला विशेष दर्जा देण्यात आला होता. तो काढण्यात आला असून आता नियमित रेल्वे म्हणून या सर्व रेल्वे धावत आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पूर्वीही जनरल तिकीट नव्हते. आताही जनरल प्रवाशांसाठी तिकीट उपलब्ध नाहीत. मात्र देवगिरी, नंदीग्राम, राज्यराणी आणि तपोवन एक्सप्रेसमध्ये जनरल प्रवाशांसाठी एक विशेष डबा ठेवण्यात आला होता.

कोरोनानंतर सुरू करण्यात आलेल्या या रेल्वेमध्ये आता जनरल तिकीट दिले जात नाहीत. याशिवाय तिकीट मशीनवरही जनरल तिकीट दिले जात नाही. यामुळे परभणी, जालना, औरंगाबाद येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरक्षण तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रेल्वेत जनरल तिकीट नसल्याने नांदेड ते औरंगाबाद, परभणी ते औरंगाबाद किंवा औरंगाबादहून दुसरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण तिकीट घ्यावे लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या