आता हेल्मेट नसल्यास सरकारी कार्यालयात 'नो-इंट्री'

कडक अंमलबजावणीचे आदेश 
आता हेल्मेट नसल्यास सरकारी कार्यालयात 'नो-इंट्री'

औरंगाबाद - aurangabad

हेल्मेट (helmet) न घालता येणाऱ्या (Two-wheeler) दुचाकीस्वारास शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. परिवहन आयुक्तांनी (Transport Commissioner) नुकतेच याबाबत आदेश काढले आहेत. त्याबाबत शासकीय स्तरावर जनजागृती करून हेल्मेट घालण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना सर्व कार्यालयास देण्यात आल्या आहेत.

याबाबत आरटीओ, (police) पोलिसांनी हेल्मेटबद्दल आधी जनजागृती करावी, नंतर कारवाई करावी, असे आदेश परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी २२ मार्च २०२२ रोजी काढले आहेत. त्यानुसार, शासकीय कार्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक अशा प्रत्येक दुचाकीचालकाला हेल्मेटशिवाय प्रवेश देऊ नये. हेल्मेट नसल्यास कारवाई करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आजपर्यंत हेल्मेट न घातलेल्यांवर कारवाई करून दंड ठोठावला जात होता. परंतु आता शहर पोलिसांनी हेल्मेटला प्रोत्साहन देण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर जनजागरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून हेल्मेटचा वापरणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांचा सन्मान करण्याचे ठरवले आहे. २८ मार्चपासून महत्वाच्या चौकात पोलिस हेल्मेटधारक दुचाकीचालकांचे छायाचित्र घेतील. दर आठवड्याला या छायाचित्रांमधून सोडत काढली जाईल. यातून पहिल्या दहा दुचाकी चालकांचा पोलिस मुख्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी ही माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com