औरंगाबादेत जमावबंदी नाही- पोलिस आयुक्त

औरंगाबादेत जमावबंदी नाही- पोलिस आयुक्त

औरंगाबाद - aurangabad

शहरात २६ एप्रिलपासून ते ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी (media) चालविली. मात्र, (aurangabad) औरंगाबादेत कोणतीही जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही. कृपया अशा चुकीच्या बातम्या प्रसारीत करू नये, असे आवाहन (Police Commissioner Dr. Nikhil Gupta) पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी केले.

औरंगाबादेत कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशान्‌सार ५ हन अधिक जणांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून असे करणार्‍यांवर कारवाई .होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, महाराष्ट्र पोलिस ऑक्ट ३५ अन्वये आदेश जारी केला आहे. पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी सांगितले की, असा आदेश आम्ही वर्षभर काढत असतो. सण-उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, तसेच विविध मिरवणुकीसाठी या आदेशानुसार आम्ही मार्ग सूचवत असतो.

मात्र, ही नियमित चालणारी प्रक्रिया असते. या आदेशाचा अर्थ जमावबंदी लागू केली असा होत नाही, असे देखील निखिल गुप्ता यांना स्पष्ट केले. तसेच या आदेशाला १ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेशी जोडले जात असून ते देखील चुकीचे असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी सागितले.

Related Stories

No stories found.