Friday, April 26, 2024
HomeUncategorizedगर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाभरात नऊ भरारी पथक

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाभरात नऊ भरारी पथक

औरंगाबाद – aurangabad

कोरोनाचा (corona) प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही गर्दी असल्याचे निदर्शनास येत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुन गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकाव्दारे गर्दीच्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व प्रादेशिक प्रमुखांची बैठक आयेाजित करण्यात आली होती. रात्री 8 वाजेपर्यंत चाललेल्या या आढावा बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याबैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, डॉ. भारत कदम तसेच सर्व तालुक्यांचे तहसिलदार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध योजनांचा आढावा या बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे 9 भरारी पथकांच्या माध्यमातून मंगल कार्यालय, हॉटेल्स, भाजी मंडई आदी ठिकाणांवर लक्ष ठेवल्या जाणार आहे. शिवाय भरारी पथकांच्या माध्यमातून गर्दीचे चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या