लहान मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली

15 फेब्रुवारी 2023 पासून होणार लागू
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमावली

औरंगाबाद - aurangabad

रस्ते परिवहन मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport) नव्या (Notification) नोटिफिकेशननुसार, पाठीमागे 4 वर्षांखालील मूल बसलेले असेल तर (Motorcycle) मोटारसायकल ताशी 40 किमी पेक्षा जास्त वेगाने चालवता येणार नाही.

मोटार वाहन कायद्याचे नवीन नियम

● केंद्रीय मोटार वाहन (motor vehicle) दुसरी दुरुस्ती) नियम, 2022 प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, मोटारसायकल चालकाने 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलाला सीटच्या मागे घेऊन जाताना सुरक्षा हार्नेस वापरावा.

● सेफ्टी हार्नेस (Safety harness) हे अ‍ॅडजस्टेबल जॅकेटसारखे असते. वाहन चालवणाऱ्या व्यक्तीसोबत ते मुलांना बांधून ठेवत असते. यामुळे अचानक झटका बसला तरी मूल खाली पडत नाही.

● नव्या नियमांनुसार वाहन चालवताना क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे. सरकारने हेल्मेटसंबधी दिलेल्या सुचनांचे पालन देखील करणे आवश्यक आहे.

● क्रॅश हेल्मेटमध्ये (Helmet) मुलाचे डोके पूर्णपणे कव्हर झालेले असते. यामुळे मूल खाली पडले तरी डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका कमी असतो.

● नवीन वाहतुक नियमांनुसार या नियमाचे उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आणि तीन महिन्याचा ड्राइविंग लायसेंस निलंबित केला जाऊ शकतो.

● दुचाकींवर मागे बसणाऱ्या मुलांसाठी अधिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन कायद्यात एक नवीन नियम समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.

● वाहतुकीचा नवीन नियम दुचाकीस्वारांसाठी हे सुनिश्चित करतो की, लहान मुलांसोबत प्रवास करताना वाहनाचा वेग ताशी 40 किलोमीटर पेक्षा जास्त नसावा.

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी करून नियमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये वाहनचालकांना सेफ्टी हार्नेस आणि क्रॅश हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव होता. हा नियम 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com