औरंगाबादकरांसाठी नवा हेल्पलाइन क्रमांक'११२'

पाच मिनिटात मिळणार पोलिसांची मदत
औरंगाबादकरांसाठी नवा हेल्पलाइन क्रमांक'११२'

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहरात सुरुवातीलापासूनच शहरातील तसेच (Police control room) जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षासाठी १०० इमर्जन्सी क्रमांक होता. मात्र आता पोलिसांच्या मदतीसाठी १०० ऐवजी ११२ क्रमांक डायल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यासाठी स्वतंत्र चारचाकी आणि दुचाकी देण्यात आली आहे.

फोन येताक्षणी लोकेशन कळणार

महाराष्ट्र राज्यात (Mumbai) मुंबई आणि (Nagpur) नागपूर येथे महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे नियंत्रण कक्ष आहेत. एखाद्या नागरिकाने ११२ क्रमांकावर कॉल करताच हा कॉल नियंत्रण कक्षाला जाईल. तेथील कॉल स्वीकारणारी व्यक्ती तुमचे नाव आणि घटना काय आहे, एवढीच माहिती विचारेल. कॉल करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन पोलिसांना लगेच कळेल. या व्यक्तीचे लोकेशन डायल ११२ च्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना कळेल. याआधारे पोलिसांना मदतीसाठीची पुढील कार्यवाही करणे सोपे जाईल.

११२ डायल केल्यास तत्काळ मदत मिळेल

११२ क्रमांक डायल केल्यानंतर लवकरात लवकर पोलीस तुमच्यापर्यंत पोहचतील. या योजनेकरिता एक चारचाकी आणि एक दुचाकी प्रत्येक ठाण्याला देण्यात आल्यामुळे शहरातील नागरिकांच्या मदतीला त्वरीत धावून जाता येईल.

२०० पेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण

नागरिकांनी मदतीसाठी कॉल केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता येईल, एकाच वेळी अनेक कॉल आले आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगत असतील तर अशा वेळी सर्वप्रथम कोणत्या घटनास्थळी पोहोचावे, अशा विविध परिस्थितींचे प्रशिक्षण पोलिसांना देण्यात आले आहे. तसेच कॉल करणाऱ्या व्यक्तीला जलद गतीने कशी मदत करावी, याविषयी २०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com