Friday, April 26, 2024
HomeUncategorizedट्विटरवर शिवीगाळ करणे पडणार महागात; कारण...

ट्विटरवर शिवीगाळ करणे पडणार महागात; कारण…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

ट्विटरवर अनेक युजर्स आपल्या भावना समाजापुढे मांडत असतात. अनेकदा युजर्सकडून कळत नकळतपणे काही चुकीचे शब्द वापरले जातात. सध्या ट्विटरवर शिवीगाळ करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे…

- Advertisement -

आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

आता ट्विटरवर (Twitter) शिवीगाळ करणे युजर्सला महागात पडणार आहे. कारण ट्विटर एक नवीन फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

आता ट्विटरकडून नवीन सेफ्टी मोड (Safety Mode) फीचरचे टेस्टिंग सुरु करण्यात आले आहे. ज्या माध्यमातून चुकीच्या भाषेत किंवा अपशब्दांचा वापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

शिवीगाळ आणि चुकीच्या भाषेत बोलताना दोषी आढळणाऱ्या युजर्सचे अकाऊंट ७ दिवसांपर्यंत सस्पेंड (account suspended) केले जाण्याची माहिती मिळत आहे.

ट्विटरवर ट्रोलिंग (Trolling) करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ट्विटरलाही अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या समस्येवर तोडगा म्हणून ट्विटर हे नवे फीचर लॉन्च करत आहे.

ट्विटरवर अर्वाच्च भाषेत बोलल्यास सुरुवातीला ७ दिवस अकाउंट ब्लॉक होईल. शिवीगाळ करणाऱ्या युजार्सला एक नोटीस पाठवली जाईल. हे फीचर सेटिंगमध्ये जाऊन टर्न ऑन करावे लागेल.

त्यानंतर ट्विटरची सिस्टिम निगेटिव्ह एंगेजमेंटवर (Negative engagement) नजर ठेवणार आहे. ट्विटरवरील कंटेट आणि ट्विट करणारा युजर्ससह त्यावर रिप्लाय करणाऱ्यावरदेखील ट्विटरचे लक्ष असणार आहे.

जर तुम्ही एखादे अकाउंट फॉलो केले असेल आणि त्याच्यासोबत तुम्ही दररोज बोलत असाल तर कंपनी असे अकाउंट ऑटो ब्लॉक (Auto block) करणार नाही. चुकीच्या भाषेत ट्विट करणाऱ्या युजर्सची ओळख पटवली जाणार आहे.

तसेच त्याला ऑटो ब्लॉक केल्यास कोणालाही त्याला फॉलो करता येणार नाही आहे. त्याचसोबत डायरेक्ट मेसेजदेखील पाठवता येणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या