औरंगाबादमध्ये होणार नवे जिल्हाधिकारी कार्यालय

इमारतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी
औरंगाबादमध्ये होणार नवे जिल्हाधिकारी कार्यालय

औरंगाबाद - aurangabad

विश्‍वासनगर-लेबर कॉलनी येथील १४ एकर शासकीय जागेवर प्रस्तावित नूतन जिल्‍हाधिकारी कार्यालयाची (Office of District Magistrate) इमारत बांधण्‍यासाठी प्रस्‍ताव, अंदाजपत्रक, वास्‍तुशास्‍त्रीय आराखडे तयार करुन परिपुर्ण प्रस्‍ताव मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भूमरे (Guardian Minister Sandipan Bhumare) यांनी दिले.

औरंगाबादमध्ये होणार नवे जिल्हाधिकारी कार्यालय
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

पालकमंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वासनगर येथील शासकीय जागेबाबत बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीस जिल्‍हाधिकारी आस्तिककुमार पाण्‍डेय यांनी पालकमंत्री यांना याप्रकरणी माहिती दिली. ते म्हणाले की, विश्‍वासनगर-लेबर कॉलनी, औरंगाबाद येथील शासकीय जागेवर अनधिकृत व्‍यक्‍तींनी केलेले अतिक्रमण व बेकायदेशिर कब्‍जा तसेच सदर सेवा निवासस्‍थाने अतिशय जीर्ण व राहण्‍यासाठी धोकादायक झाले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानुसार ११ मे २०२२ रोजी ही जागा मोकळी करून शासनाच्या ताब्‍यात घेण्‍यात आलेली आहे.

अंदाजे १४ एकर जागेवर नूतन जिल्‍हाधिकारी कार्यालयाची सुसज्‍ज ३ मजली इमारतीच्‍या प्रस्‍तावाचे सादरीकरण झालेले आहे. त्‍यानुसार नूतन इमारतीत जिल्‍हाधिकारी कार्यालया अंतर्गत सर्व विभाग, मुख्‍यमंत्री, उपमुख्‍यमंत्री यांची दालने, सचिव दर्जाच्‍या अधिकाऱ्यांसाठी दालने व बैठक व्‍यवस्‍था, मंत्रीमंडळाच्‍या बैठकीसाठी, जिल्‍हा नियेाजन समितीच्‍या बैठकीसाठी २०० आसन क्षमतेचे २ सुसज्‍ज हॉलचा समावेश करण्‍यात आलेला असून याबाबतचा वास्‍तुशास्‍त्रीय प्रारूप आराखडा व अंदाजपत्रकाच्या प्रस्‍तावास पालकमंत्री यांनी मान्‍यता देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांनी केली.

बैठकीत पालकमंत्री भुमरे यांनी सर्व वास्‍तुशास्‍त्रीय आराखडे व अंदाजपत्रकाचे अवलोकन करुन त्यास मान्‍यता दिली. पुढील मंजुरीसाठी सर्व प्रस्ताव महसूल विभागामार्फत शासनास तात्‍काळ सादर करण्‍याचे निर्देश दिले.

यावेळी अशोक ये‍रेकर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेख वहीद उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्‍तर उपविभाग, अ. अ. वाघवसे वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, संतोष वाकोडे वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, सोनम पाटील वास्‍तुशास्‍त्रज्ञ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, विवेक जोशी शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उत्‍तर उपविभाग आदी अधिकारी उपस्थित होते.

औरंगाबादमध्ये होणार नवे जिल्हाधिकारी कार्यालय
Visual Story या अभिनेत्रीने कमी वयात मिळविली अफाट लोकप्रियता...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com