World Braille Day 2022 : जाणून घ्या, का साजरा केला जातो जागतिक ब्रेल दिवस? काय आहे इतिहास?

World Braille Day 2022 : जाणून घ्या, का साजरा केला जातो जागतिक ब्रेल दिवस? काय आहे इतिहास?

आज ४ जानेवारी. जागतिक ब्रेल दिन (World Braille Day 2022). जागतिक ब्रेल दिन हा अंध आणि दृष्टिबाधित व्यक्तींसाठी आणि त्यांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. ब्रेल लिपीचे निर्माते लुई ब्रेल (Louis braille) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिन निडवण्यात आला आहे.

लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. त्यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत, लिपी विकसित केली. त्यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. (braille meaning in hindi)

लुई ब्रेल यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्‍याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेले लुई सगळ्यांचे लाडके होते. (braille script)

लुईस ब्रेल जन्मापासूनच अंध नव्हते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्याबरोबर एक घटना घडली, ज्याने आयुष्यभर त्यांची दृष्टी हिरावून घेतली. लुई एक दिवस त्यांचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुई यांनी वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादात त्यांनी एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्यांच्या एका डोळ्यात घुसली. (braille)

त्यावेळी त्यांच्यावर महागडे उपचार करण्या इतके पैसे त्यांच्या कुटुंबाकडे नव्हते. म्हणून घरी पट्टी बांधून डोळा बरे होण्याची अपेक्षा केली जात होती. परिणामी ही जखम गंभीर होत गेली आणि कालांतराने दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग झाल्यामुळे लुईस ब्रेलचे यांचे दोन्ही डोळे कायमचे निकामी झाले. (braille day)

१८१६ मध्ये लुई यांच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक धर्मगुरु आले होते. त्यांच्या मदतीने लुई यांचे शिक्षण सुरू झाले. अंध मुलांसाठी असलेली जगातील पहिली शाळा पॅरीस येथील (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) येथे धर्मगुरु पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून लुई यांना प्रवेश मिळवून दिला. (world braille day)

या शाळेत प्रवेश घेणारे लुई हे सगळ्यात लहान विद्यार्थी होते. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई यांनी या शाळेत शिकले. सहा वर्षात लुई यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागले.

ते पॅरिस येथे असताना फ्रेंच लष्करातील अधिकारी कॅप्टन चार्ल्स बार्बर हे उठावदार टिंबे व रेघा यांच्या आधारे रणांगणावरील संदेशवहनासाठी त्यांनी तयार केलेल्या लेखनपद्धतीचे प्रशिक्षण सैनिकांना देण्यासाठी तेथे आले होते. त्यांच्या लेखनपद्धतीमध्ये शब्दांचा आवाज स्पेलिंगशिवाय ओळखला जात असे. ब्रेल यांनी स्वत: या लेखनपद्धतीचा विशेष अभ्यास केला व तिचेच परिष्करण करून त्यांनी स्वत:ची लिपी तयार केली. तीच पुढे ब्रेल लिपी म्हणून विख्यात झाली.

ब्रेल लिपीवर पहिले पुस्तक १८२९ मध्ये प्रकाशित झाले. लुई यांचा मृत्यू ६ जानेवारी १८५२ मध्ये ४३ व्या वर्षी झाला. मात्र अंधांसाठी निर्माण केलेल्या ब्रेल लिपीच्या माध्यामातून आजही ते लोकांच्या स्मरणात आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com