विमान सेवेबाबत मोठा निर्णय होणार?; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे
विमान सेवेबाबत मोठा निर्णय होणार?; आरोग्य मंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

दिल्ली । Delhi

देशात करोनाचा प्रसार कमी होत आहे. दुसरीकडे लवकरच लसही येणार आहे. तीन कंपन्यांनी त्यासाठी अर्ज केला आहे. असं असतानाच करोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये सरकारला पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागला आहे. दरम्यान, भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा (Coronavirus Strain) नवं रुप आढळल्यानंतर भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जेएमजीची तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमधील करोनाच्या नव्या रुपातील स्ट्रेन वेगाने संसर्ग पसरवत आहे. भारत सरकार याबाबत सतर्क झाले असून आरोग्य सेवा महानिर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात.

तसेच, संयुक्त देखरेख गटाची आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या या नव्या प्रकाराबद्दल या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रोडरिको ऑफ्रिन हे सुद्धा संयुक्त देखरेख गटाचे सदस्य आहेत.

आरोग्यविषयक पत्रकार जेम्स गैलेगर यांनी याबाबत एक सल्ला दिला आहे. करोना विषाणूचे बदलणे स्वाभाविक प्रक्रि्या आहे. संसर्ग वेगानं होण्यासाठी विषाणूमध्ये असे बदल होत असतात, असं जेम्स गैलेगकर यांनी सांगितले. जेम्स यांनी प्रयोगशाळेत अभ्यास केल्यानंतर करोनाचे नवीन स्ट्रेन किती गंभीर आहे, हे समजेल असं सांगितले. करोना वॅक्सिन नव्या स्ट्रेनवर परिणाम करेल की नाही, हे पाहावं लागेल, असंही त्यांनी सांगितले. करोना विषाणूचे नवे रुप (Coronavirus Strain) ज्या ठिकाणी वाढले आहे त्या ठिकाणी करोना संसर्ग वेगाने वाढले आहे, याचा अभ्यास करणं शास्ज्ञत्रांपुढील आव्हान असल्याचं गैलेगर यांनी म्हटले.

ब्रिटनमध्ये नव्यानं आढळलेल्या करोना विषाणूमुळे (Corona Virus) लंडन, साऊथ इंग्लंडमधील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि इतर सण पहिल्यासारखे साजरे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

केंद्र सरकारने युनायटेड किंगडमला जाणाऱ्या सर्व विमानांचे उड्डान थांबवावे - पृथ्वीराज चव्हाण

नव्याने आलेल्या करोना व्हायरस (New Coronavirus) बाबत स्पष्टता येईपर्यंत केंद्र सरकानेर युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) जाणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवायला हवे. तसेच, युके (UK) मधून येणाऱ्या सर्व विमानांतील प्रवाशांना काही काळ अलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते (Congress Leader) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला इशारा आणि केंद्र सरकारला केलेले आवाहन जागतिक परिस्थीती पाहता अत्यंत महत्त्वाचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com