Video : हरियाणामध्ये शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, आंदोलकांवर पाण्याचा मारा

Video : हरियाणामध्ये शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्का-बुक्की, आंदोलकांवर पाण्याचा मारा

दिल्ली | Delhi

हरियाणाच्या (Hariyana) झज्जरमध्ये उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Deputy CM Dushyant Chautala) यांच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना झाल्याचे वृत्त हाती येत आहे.

आज सकाळीच महिला आणि पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने हातात झेंडे घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाताना दिसले, पण ते रस्त्यातच पोलिसांशी भिडले. यादरम्यान, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, यानंतर झज्जर पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा केला.

Related Stories

No stories found.