
मुंबई | Mumbai
मृत्यू कधी, कुठे कसा येईल सांगू शकत नाही. मृत्यूवर कोणीही मात करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही. मृत्यू होणं न होणं आपल्या हातात नाही. असं असताना एका मुलाने एकाच अपघातात मृत्यूला दोन वेळा चकवा दिला आहे.
या अपघाताचा व्हिडीओ एका सीसीटीव्ही कॅमेरऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमचा देखील विश्वास नाही बसणार. एवढेच नाही तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावर असे वाटेल की, तुम्ही कोणत्यातरी सिनेमातील दृश्य बघत आहात.
केरळमधील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सामान्य वाहतूक असलेला एक सिंगल-लेन रस्ता दिसत आहे. एक सायकलस्वार मुलगा अचानकपणे आणि भरधाव वेगाने या रस्त्यावर येतो आणि एका दुचाकीला धडकतो.
मात्र, दुचाकी थांबत नाही आणि सायकलही जागीच पडते. सुदैवाची गोष्ट म्हणजे, या धडकेनंतर सायकलवरील मुलगा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडतो आणि मागून येणाऱ्या बसखाली येण्यापासून वाचतो.