पाच राज्यातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात

पाच राज्यांबरोबरच देशभरातल्या लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतल्या विधानसभेच्या बारा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकींची मतमोजणीही उद्या
पाच राज्यातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात
File Photo

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहे.

या निवडणुकांची मतमोजणी उद्या होत आहे. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या पाच राज्यांबरोबरच देशभरातल्या लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतल्या विधानसभेच्या बारा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकींची मतमोजणीही उद्या होणार आहे. यात बेळगाव लोकसभा आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचाही समावेश आहे.

सर्व ठिकाणी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. मतमोजणीचे काल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या मोबाईला अॅपवरही आपल्याला मतमोजणीचे काल आणि निकाल कळू शकतील.

मतमोजणी केंद्रांवर कोविड निर्बंधांच काटेकोर पालन होतं की नाही याकडे जातीनं लक्ष देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकार्याना दिले आहेत. उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीनं आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अलावाल सादर केला नाही तर त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

निवडणूक निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता असली तरी यावेळी करोना निर्बंधांमुळे कुठेही विजय मिरवणुका काढता येणार नाहीत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com