'सर, नका ना जाऊ'; सरकारी शाळेतील शिक्षकाचा अखेरचा दिवस; विद्यार्थ्यांसह सर्वच रडले

व्हिडीओ होतोय ट्विटरवर ट्रेंड
'सर, नका ना जाऊ'; सरकारी शाळेतील शिक्षकाचा अखेरचा दिवस; विद्यार्थ्यांसह सर्वच रडले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आई वडिलांनंतरचा गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक मुलांना कितीही रागावला तरीदेखील त्याला शाळेत आल्याशिवाय, विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय चैन पडत नाही. वर्षानुवर्षे शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला कुठेतरी उसंत घ्यावी लागते. त्यासही मर्यादा असतात त्या पाळणे गरजेचे असते. असेच एक सरकारी शाळेतील शिक्षक निवृत्त झाले.... (government school teacher video Karnataka)

शाळेत त्यांचा तो दिवस शेवटचा दिवस होता. (Teacher last day in school) शिक्षकाचा स्वभाव, शिकवण्याची कला, बोलण्याची ती अनोखी शैली यामुळे आवडते शिक्षक म्हणून ते शाळेत परिचित होते.

मुलांना त्यांच्यावाचून करमत नसे अन मुलं नसली की त्यांनाही अतोनात त्यांची आठवण येत असे. असे अशा या भारी व्यक्तिमत्व असलेल्या शिक्षकाच्या निवृत्तीचा दिवस आला अन नियमाप्रमाणे त्यालाही शाळेला अखेरचा सलाम करावा लागला.

मात्र, या शिक्षकाच्या जीवनातला अखेरचा तो शाळेचा दिवस खूप भावूक होऊन गेला होता. या घटनेचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होत आहे.

शिक्षकांचा सन्मान करून शिक्षणाचा मान राखत अनेक ठिकाणी शिक्षक देवासारखे पूजले जातात याचा प्रत्यय आणखी एकदा आला आहे.

दिवसभर शाळेत शिकवल्यानंतर शिक्षकाला शाळेच्या वतीने निरोप दिला जात होता. सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी अन विद्यार्थिनी शाळेच्या आवारात जमले. शिक्षकांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. कुणी शिक्षकांचे पाय धरत होते, तर कुणी शिक्षकांना मिठी मारत होते.

या शिक्षकाने प्रथम सहकारी शिक्षकांना मिठी मारलेली दिसते आहे. यात एका विद्यार्थ्याने त्यांना शाल आणि पुष्पहार घालून निरोप दिला. यावेळीही अनेक विद्यार्थी या शिक्षकाच्या पायावर नतमस्तक झालेले दिसत आहेत.

तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसावा इतका हा भावनिक व्हिडिओ आहे. हा क्षण पाहून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ कर्नाटकातील एका सरकारी शाळेचा असून एका सनदी अधिकाऱ्याने सर्वप्रथम हा व्हिडीओ शेअर केल्याचे बोलले जात आहे. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com