बंगळुरुमध्ये हिंसाचार : तीन मृत्यू, ६० जखमी

फेसबुक वरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जमाव झाला संतप्त
बंगळुरुमध्ये हिंसाचार : तीन मृत्यू, ६० जखमी
courtesy ; twitter

बंगळुरु | Bengaluru

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हिंसाचार उसळला आहे. एका आमदारांच्या भाच्याने केलेल्या फेसबुक पोस्टनंतर हा हिंसाचार घडला आहे. संतप्त जमावाने त्या आमदाराच्या घरावर हल्ला केला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंग मध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पोलिस जखमी झाले आहे. केली

त्या आमदाराच्या भाच्याने एका समुदायाच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळीत समुदायाने त्या आमदाराच्या घरासमोर गर्दी केली. संतप्त जमावाने त्या आमदाराच्या घरावर दगडफेक केली. तसेच तिथे असलेल्या दोन ते तीन गाड्यांना आगही लावली. त्यानंतर संतप्त जमावाने आपाल मोर्चा डीजे हल्ली पोलीस स्थानकाकडे वळवला आणि तिथे तोडफोड केली. संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना फायरिंग करावी लागली. या फायरिंगमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरू मध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत ११० जणांना अटक केली असून पोलिस कमिशनर कमल पंत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com