
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सोशल मीडियावर वन्य प्राण्यांविषयी वेगवेगळे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. वन्य प्राण्यांचे व्हिडीओ पाहण्यासाठी नेटकरी नेहमीच उत्सुक असतात. आता वन्यप्राण्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत अजगर आणि जंगलाच्या राजाचा थरार दिसून येत आहे...
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, सिंहाचे पिल्लू अजगराच्या शिकारीसाठी येते. तो अजगराच्या दिशेने तोंड घेऊन जात असताना अचानक अजगर सिंहाच्या तोंडावरच हल्ला करतो आणि त्याच्या तोंडाला चावा घेतो.
त्यानंतर सिंह तिथून धूम ठोकतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत.