
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
दररोज सोशल मीडियावर कुठला ना कुठला व्हिडीओ व्हायरल होतच असतो. अनेक प्राण्यांचे व्हिडीओ अनेकदा चर्चेचा विषय बनतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे...
चित्ता या प्राण्याच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. या चित्त्याच्या धावण्याचा वेग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हायरल झालेल्या चित्त्याच्या व्हिडीओत चित्ता अत्यंत वेगाने धावताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा चित्ता ताशी 120 किलोमीटर वेगाने धावताना 22 फूट अंतर एकाच उडीत कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.