Video : माजी मुख्यमंत्री म्हणतात, 'करोना विषाणूही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार'

सोशल मीडियावर ट्रोल
Video : माजी मुख्यमंत्री म्हणतात, 'करोना विषाणूही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार'

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे.

मात्र, अशा परिस्थिती भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक अजब दावा केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्रिवेंद्र सिंह रावत ‘कोरोना विषाणूही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’, असं म्हणताना दिसत आहेत.

'दर्शनी पाहता करोना विषाणूही एक जीव आहे, इतरांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु, आपण मनुष्य स्वत:ला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो आणि त्याला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तो स्वत:च रुप बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्याला सुरक्षित राहण्यासाठी विषाणूला मागे टाकण्याची गरज आहे' असं वक्तव्य त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावरती चांगले व्हायरल झाले असून विरोधी पक्षांकडून टिका ही होताना दिसत आहे.

या व्हिडिओवर राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवाय यांनी, 'करोना एक प्राणी आहे असे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह म्हणत आहेत. या विचारसरणीनुसार त्याला आधारकार्ड किंवा रेशन कार्डही द्यायला द्यायला पाहिजे,' असा उपरोधिक टोला लगावला आहे.

तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. “हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरला त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com