सलाम तुमच्या शौर्याला! भारतीय जवानांचा हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल

सलाम तुमच्या शौर्याला! भारतीय जवानांचा हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल

दिल्ली | Delhi

थंडीच्या कडाक्यामुळे सध्या संपूर्ण देशाभर शीतलहरी सुरू आहेत. हवामानातील बदलांमुळे तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

अशा परिस्थितीत एक अशी बातमी समोर आली आहे, जी वाचल्यानंतर तुमचीही छाती अभिमानाने उंचावेल. या घटनेनं सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. हिमवृष्टीच्या वेळी सैनिकांनी एका गर्भवती महिलेला खांद्यावर बसवून रुग्णालयात दाखल केलं. याचा एक व्हीडिओही समोर आला आहे.

सलाम तुमच्या शौर्याला! भारतीय जवानांचा हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल
Happy Birthday Hima Das : वाचा, 'हिमा दास'च्या जिद्दीची कहाणी!

जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, एका गर्भवती महिलेला त्रास होऊ लागल्याने लागल्याने तिने भारतीय लष्कराच्या जवानांना मदतीचे आवाहन केले. यानंतर जवानांनी तात्काळ त्या गर्भवती महिलांना जवानांनी स्ट्रेचरवरच्या साह्यानं रुग्णालयात नेलं. हे जवान गर्भवती महिलेसाठी देवदूत ठरले.

सलाम तुमच्या शौर्याला! भारतीय जवानांचा हा VIDEO पाहून तुमचा ऊर अभिमानाने भरुन येईल
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

जवानाच्या या कर्तुत्वाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी जवानांच्या या कार्याला सोशल मीडियावर सलाम केलाय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com