
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सोशल मीडियावर दररोज कुठला ना कुठला व्हिडीओ व्हायरल होत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत आहे...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका तरुणाच्या हातात हेल्मेट दिसून येत आहे. हेल्मेटसोबतच त्या तरुणाच्या हातात किचनमधील चपाती शेकण्याचा चिमटादेखील आहे.
हेल्मेटमधून तरुण चिमट्याने काही तरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तो हेल्मेटमधून काय काढतोय हे सुरुवातीला समजत नव्हते. त्यानंतर त्या हेल्मेटमधून साप निघतो. हा साप विषारी असतो.
नशिब बलवत्तर म्हणून तरुणाने हेल्मेट घालण्यापूर्वी त्यात साप पाहिला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या असून नेटकऱ्यांनी पोस्टवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.