
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
ओडिशातील (Odisha) संबलपूर जिल्ह्यातून (Sambalpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नावरून परतणाऱ्या वऱ्हाडींचे वाहन कालव्यात कोसळल्यामुळे वराच्या बाजूचे सात जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना आज पहाटे घडली आहे...
अजित खमारी, दिव्या लोहा, सरोज सेठ, सुमंत भोई, सुबल भोई आणि रमाकांत भोई अशी मृतांची नावे आहेत. सातव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना संबलपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झारसुगुडा जिल्ह्यातील लद्दारा गावातून वराचे कुटुंबीय आणि नातेवाईकांना घेऊन जाणारे वाहन गुरुवारी संध्याकाळी संबलपूरमधील परमपूर भागात गेले होते. रात्रीचे जेवण उरकून वराच्या पक्षातील काही सदस्य गाडीतून घरी परतत होते.
चालकाचा वाहनावरील वाहन कालव्यात कोसळले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.