Video : महात्मा गांधींमुळे सावरकरांनी दया याचिका दाखल केली; राजनाथ सिंहाचा दावा

Video : महात्मा गांधींमुळे सावरकरांनी दया याचिका दाखल केली; राजनाथ सिंहाचा दावा

दिल्ली | Delhi

संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (VD Savarkar) यांच्याबद्दल वक्तव्य करताना एक मोठा दावा केला आहे.

सावरकरांच्या (Savarkar) विरोधात खूप खोटे बोलले गेले. वारंवार म्हटलं गेलं की, त्यांनी ब्रिटिश (British) सरकारसमोर अनेक दया याचिका दाखल केल्या. मात्र हिंदुत्वाचे आयकॉन वीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या (mahatma gandhi) सूचनेवरून अंदमान तुरुंगात (Andaman jail) कैदेत असताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली, असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ()Ambedkar International Center सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये सावरकरांवरील पुस्तकाचे प्रकाशन करताना सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनीही मेळाव्याला संबोधित केले.

राजनाथ सिंह म्हणाले की, 'सावरकरांनी ब्रिटिश सरकारपुढे अनेक दया याचिका दाखल केल्या हे सातत्याने सांगितले जाते. पण सावरकरांनी सुटकेसाठी याचिका दाखल केल्या नाहीत. पण साधारणपणे कैद्याला दया याचिका दाखल करण्याचा अधिकार असतो. तुम्ही दया याचिका दाखल करा, असे महात्मा गांधी म्हणाले होते. गांधीजींच्या या सूचनेनंतरच त्यांनी दया याचिका दाखल केली होती. त्यावेळी महात्मा गांधींनी सावरकरांना ब्रिटिशांना सोडून द्यावं असं आवाहनही केलं होतं. तेव्हा गांधीजींनी असंही म्हटलं होतं की, ज्याप्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत तशाच पद्धतीने सावरकर देखील स्वातंत्र्य चळवळ सुरु ठेवतील. पण त्यांना असं बदनाम केलं जातं की, सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती, क्षमायाचना केलेली किंवा आपल्या सुटकेची मागणी केलेली.' असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

दरम्यान राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी निशाणा साधला आहे. हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असेच चालू राहिले तर ते महात्मा गांधींना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवती, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.