वंदे भारत ट्रेन महिन्याभरात चौथ्यांदा अपघातग्रस्त

वंदे भारत ट्रेन महिन्याभरात चौथ्यांदा अपघातग्रस्त

दिल्ली | Delhi

गुजरातमधील वलसाडमध्ये वंदे भारत ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. ही घटना वलसाडच्या अतुलजवळ घडली.

गाय धडकल्याने हा अपघात झाला असून, या घटनेत ट्रेनचा समोरील भाग तुटला आहे. तसेच रेल्वेच्या इंजिनाजवळील खालच्या भागात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चालू महिन्यात आतापर्यंत ही रेल्वे तब्बल ४ वेळा जनावरांना धडकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत ट्रेन शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास वलसाडच्या रेल्वेस्थानकावरून जात होती. तेव्हा अचानक तिच्यापुढे बैल आला. यावेळी झालेल्या धडकेत रेल्वेच्या समोरील भाग फुटला. त्यानंतर रेल्वे जवळपास २६ मिनिटे स्थानकावर उभी राहिली. त्यानंतर ती रवाना झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com