व्हॉल्व्ह असलेला एन-95 मास्क असुरक्षित

व्हॉल्व्ह असलेला एन-95 मास्क असुरक्षित

करोनापासून वाचवू शकत नाही, केंद्राच्या नव्या सूचना

नवी दिल्ली | New Delhi - करोना संकटकाळात विषाणूंपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आता व्हॉल्व्ह असलेल्या एन 95 (Valved N95 face masks) मास्कबाबत आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्हॉल्व्ह असलेल्या एन 95 वापरल्याने करोना विषाणूंपासून संसर्ग टळण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान हे मास्क आरोग्यास हानिकारक Harmful to health असल्याचेही सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने पत्रकात म्हटले, समाजात एन95 मास्कचा आणि प्रामुख्याने व्हॉल्व्ह असलेल्या एन95 मास्कचा चूकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान आरोग्य यंत्रणेतील विशिष्ट वर्ग वगळता इतरांनी तो वापरणे हे हानिकारक आहे. त्यामुळे सामान्यांना घरगुती कापडी किंवा सर्जिकल मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एन95 मास्कचा वापर प्रामुख्याने प्रदुषित वातावरणातील अतिसूक्ष्म कण श्वसनमार्गात जाऊ नये म्हणून केला जातो. दरम्यान या मास्क मधील 95 ही संख्या 95% हवा फिल्टर होत असल्याचे संकेत देते. त्यामुळे चेहर्‍यावर तो घातल्यानंतर हवा आत-बाहेर जाण्यावर बंधने येतात. अनेकांना यामुळे श्वास घेणे, सोडणे कठीण वाटते. त्यामुळेच मास्क वर देखील तशा सूचना दिल्या आहे.

एन95 मास्कमध्ये म्हणूनच व्हॉल्व्ह असलेले काही मास्क उपलब्ध करण्यात आले ज्यामुळे हवा बाहेर फेकण्यास एक मार्ग राहील. पण कळत नकळत करोनाची लागण झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी व्हॉल्व्ह असलेला एन95 मास्क घातला असेल तर खोलीत त्याच्या श्‍वासोच्छवासातून हवेमार्फत, वस्तूवर करोना व्हायरस बाहेर पडू शकतो. त्यामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका वाढला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com