मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून; पंतप्रधानांची घोषणा

मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून; पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | New Delhi

१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची (Vaccination) घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेदेखील पंतप्रधानांनी जाहीर केले आहे...

देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार जानेवारीपासून करण्यात येणार आहे. त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची सुरुवात ३ जानेवारीपासून होणार आहे.

तसेच आघाडीवरील कर्मचारी आणि आरोग्य सेवांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून वर्धक लसमात्रा देण्यात येणार असल्याचेदेखील पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

भारतात करोना (Corona) आणि ओमायक्रॉन (Omicron) विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले. मोदी म्हणाले की जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे.

करोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com