दिल्ली l Delhi

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील जोशीमठाच्या परिसरात रविवारी (७ फेब्रुवारी) सकाळी दहाच्या सुमारास नंदादेवी नदीजवळील महाकाय हिमकडा कोसळल्याने

धौलीगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे पर्वतीय क्षेत्रात प्रचंड नुकसान झाले आहे. दुर्घटना घडून सहा दिवस झाले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३६ वर पोहोचली असून २०४ जण बेपत्ता आहेत.

दरम्यान, दौलीगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या ३० हून अधिक जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेले प्रयत्न काही वेळासाठी थांबवावे लागले होते. मात्र पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मदतकार्य पुन्हा सुरू करण्यात आले, मात्र सध्या छोटी पथकेच पाठविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्यापूर्वी मदतकार्य पथकाने बोगद्याच्या सुरुवातीला असलेला चिखल काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताच मदतकार्य पथकातील कर्मचारी अवजड यंत्रांसह बोगद्याच्या बाहेर आले. तसेच बोगद्यात ६८ मीटर आतमध्ये खोदकाम सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेल्यांसाठी प्राणवायूच्या सिलेंडरसारखी जीवरक्षक उपकरणे नेण्यावर सध्या भर आहे. बुधवापर्यंत १२० मीटपर्यंतचा गाळ उपसण्यात आला होता. बोगद्यात १८० मीटरवर काही जण अडकलेले आहेत.

तसेच तपोवन बोगद्यामधून गाळ काढण्यासाठी सर्वात मोठी एक्सावेटर मशीन मागवण्यात आली आहे. या मशीनच्या साहाय्याने बोगद्यातील गाळ काढण्याचं काम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने उत्तराखंडच्या हिमालय परिसरात भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी १५ सेन्सर लावण्यात येणार आहेत. चामोली जिल्ह्यातील थराली तालुक्यातील फल्दिया गावातील १२ कुटुंबाला सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.