उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

दिल्ली | Delhi

उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातील नीती घाटी परिसरात हिमवृष्टीनंतर हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

परिस्थितीचं गांभिर्य ओळखून भारतीय लष्कराने तात्काळ बचावकार्य सुरु केलं. आतापर्यंत ४३०जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात लष्कराला यश आलं आहे. या सर्वांना लष्कराच्या कँपमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामधील सहा ते १० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लष्काराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी, २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्ठी झाली होती. जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात भारत-चीन सीमेजवळही तुफान बर्फवृष्टी झाली. त्यामुळे ही दुर्घटना झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रावत यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्यात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com