नवी दिल्ली -

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा

राज्यपालांकडे दिला आहे. आता उत्तराखंडची धुरा कोणाकडे सोपवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्या(10 मार्च) याबाबत पक्षाची बैठक होणार आहे. यावेळी नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसर्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता. मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली. असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, असे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले आहे.