बस दरीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

बस दरीत कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तराखंड मध्ये घडली आहे. देहरादून (Dehradun) येथील विकासनगर परिसरातील बुल्हाड बायला रोडवर हा भीषण अपघात (bus accident at bulhad - Baila Road in Dehradun) झाला आहे.

चकराता कडे निघालेले वाहन विकासनगर गावाच्या पलीकडे रविवारी बायला-पिंगुवा मार्गावर बायला गावाचा पुढे चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने खोल दरीत कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार या गाडीत १६ जण होते. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. १३ मृतांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर झाले असून स्थानिक लोकही मदतकार्यात गुंतले आहेत. माहिती मिळताच डेहराडून येथून एसडीआरएफ, जिल्हा पोलिस आणि अग्निशमन दलाचे बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले . एसपी ग्रामीण स्वतंत्र कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com