पंतप्रधान मोदींकडून योगींचं तोंडभर कौतुक, म्हणाले...

पंतप्रधान मोदींकडून योगींचं तोंडभर कौतुक, म्हणाले...
file photo

वाराणसी| Varanasi

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत ((Narendra Modi in Varanasi)) विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पोहोचले आहेत. याठिकाणी त्यांनी 1583 कोटी रुपयांच्या विकास योजनांचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांच्या करोना नियंत्रणाबद्दल (Corona control) कामाचे तोंडभरून कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटल आहे की, 'करोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. मी काशीमधल्या माझ्या सहकाऱ्यांचे, शासन- प्रशासनाचे, करोना योद्ध्यांच्या संपूर्ण गटाचे विशेष आभार मानतो. तुम्ही ज्याप्रमाणे दिवस-रात्र झटून व्यवस्था निर्माण केली आहे, ही खूप मोठी सेवा आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संकटं आली. करोना विषाणूच्या बदलणाऱ्या आणि अधिक घातक रुपाने संपूर्ण ताकदीने आपल्यावर हल्ला चढवला. मात्र, काशीसहित संपूर्ण उत्तरप्रदेशने या संकटाशी खंबीरपणे लढा दिला.'

तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माफिया राज आणि बोकाळत सुटलेल्या दहशतवाद, यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. आज गुन्हेगारांना समजले आहे, की ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तर प्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीपासून मुक्त आहे. यूपी सरकार विकासवादावर चालत आहे. आता येथे जनतेच्या योजनांचा फायदा थेट जनतेला मिळत आहे.'

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनी भाष्य केले होते, की उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा चेहरा कोण असेल, हे केंद्रीय नेत्व ठरवेल. यातच आज पंतप्रधान मोदींनी स्वतःच सीएम योगींचे उघडपणे कौतुक केले आहे. यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com