Mukhtar Ansari : अवधेश राय हत्या प्रकरणी माफिया मुख्‍तार अन्सारीला जन्मठेप, ३२ वर्षांनंतर लागला निकाल

Mukhtar Ansari : अवधेश राय हत्या प्रकरणी माफिया मुख्‍तार अन्सारीला जन्मठेप, ३२ वर्षांनंतर लागला निकाल

वाराणसी | Varanasi

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी एमएलए कोर्टाने (Varanasi MP-MLA Court) अवधेश राय यांच्या (Awadhesh Rai murder) खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 32 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Varanasi’s MP MLA court awards life imprisonment to jailed mafia Mukhtar Ansari in 1991 Awadhesh Rai murder case)

या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलिस स्थानकात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्तार अन्सारी सध्या बांदा तुरुंगात आणि भीम सिंग गाझीपूर तुरुंगात आहे. तर कमलेश सिंह आणि अब्दुल कलाम यांचा मृत्यू झाला आहे. पाचवा आरोपी राकेश याने या प्रकरणाची फाईल वेगळी केल्याने त्यावरील प्रयागराज सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com