आगामी विधानसभा निवडणुका नियोजित वेळतच!

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
आगामी विधानसभा निवडणुका नियोजित वेळतच!

दिल्ली | Delhi

पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, दुसरीकडे करोनाची रूग्णसंख्य हळूहळू वाढत असून ओमायक्रॉनचा धोका देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत होती.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका वेळेवर (UP Election) होतील, त्याचे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र (Chief Election Commissioner Sushil Chandra) यांनी दिले आहेत, त्यांनी यूपीचा दौरा केला आहे. आयोगाने (Election commission) सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ((2022 UP Assembly elections) सर्व पक्षांनी वेळेवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यूपी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सांगितले की विधानसभा निवडणुका सर्व करोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर व्हाव्यात.

मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

- सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली. कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका वेळेवर घेण्यात याव्यात. काही राजकीय पक्षांचा जास्त होणाऱ्या सभांविरोधात आहेत. त्यांनी सभांची संख्या मर्यादित ठेवण्याची सूचना केली आहे.

- अनेक मुद्द्यांवर राजकीय पक्षांनी सूचना दिल्या आहेत. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मतदान केंद्र बनवू नये, असे पक्षांचे म्हणणे आहे.

- मतदार यादी ५ जानेवारी २०२२ ला प्रसिद्ध केली जाईल. राज्यातील एकूण मतदारांची संख्या आतापर्यंत १५ कोटींहून अधिक आहे. अंतिम आकडा यादी प्रसिद्ध झाल्यावर समोर येईल.

- आतापर्यंत ५२.८८ लाख मतदारांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. हा विक्रम आहे. २३.९२ लाख पुरुष तर २८.८६ लाख महिला मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील सुमारे १९.८९ लाखांचा समावेश आहे. हे संख्या गेल्या वेळेपेक्षा जास्त आहे.

- २०१७ मधील गेल्या निवडणुकीत लिंग गुणोत्तर ८३९ होते. म्हणजे दर हजार पुरुषांमागे ८४९ महिला. जनजागृती मोहिमेनंतर ती ८६८ पर्यंत वाढली आहे.

- सर्व मतदान केंद्रांवर VVPAT बसवण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी सुमारे १ लाख मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध असेल.

- ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, अपंग व्यक्ती आणि कोविड बाधित रुग्ण जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत, निवडणूक आयोग मतदानासाठी त्यांच्या दारापर्यंत पोहोचेल. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ अशी असेल.

- २०१७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये ५९ टक्के मतदान झाले होते. ज्या राज्यात राजकीय जागरुकता जास्त आहे, त्या राज्यात मतदानाची टक्केवारी कमी का, हा चिंतेचा विषय आहे.

- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे स्वत:वरील आरोप आणि कलमांची माहिती जनतेला द्यावी लागेल. यासोबतच राजकीय पक्षांना जाहिराती देऊन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची निवड का केली, हेही स्पष्ट करावे लागणार आहे. याशिवाय पेड न्यूजवरही कडक अंकुश ठेवला जाईल.

- पूर्वी १५०० नागरिकांसाठी एक मतदान केंद्र असायचे. यावेळी कोविडच्या पार्श्वभूमीवर १२५० मतदारांसाठी एक केंद्र बनवले जाणार आहेत. त्यामुळे या वेळी ११ हजार मतदान केंद्र वाढतील. ८०० मतदान केंद्रे अशी असतील जिथे सर्व सुरक्षा कर्मचारी आणि मतदान कर्मचारी फक्त महिला असतील.

तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कोविड प्रोटोकॉल अंतर्गत निवडणुका घ्याव्यात असे सांगितले आहे. निवडणूक आयोग दाट लोकवस्तीचे मतदान केंद्र मोकळ्या जागी आणेल, महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जाईल आणि वृद्धांसाठीच्या सुविधांकडेही लक्ष दिले जाईल. पेड न्यूजवरही चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध होणार असल्याची माहितीही देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com