ह्रदयद्रावक! लग्नस्थळी आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू, ७ जखमी

ह्रदयद्रावक! लग्नस्थळी आग लागून ५ जणांचा होरपळून मृत्यू, ७ जखमी

उत्तर प्रदेश | Uttar Pradesh

लग्नस्थळी (marriage venue) भीषण आग (Fire) लागल्याचे ह्रदयद्रावक घटना उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे.

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप असष्ट आहे. मात्र शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com