उत्तरप्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचे करोनाने निधन
देश-विदेश

उत्तरप्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचे करोनाने निधन

१८ जुलै रोजी त्या करोना बाधीत आढळल्या होत्या.

Nilesh Jadhav

उत्तरप्रदेश | Uttarpradesh

उत्तरप्रदेश सरकार मधील कॅबिनेट मंत्री कमल राणी वरुण यांचे करोनाने निधन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट द्वारे याबाबत माहिती दिली.

कमल राणी वरुण यांचा १८ जुलै रोजी करोना अहवाल आला होता. त्यात त्या बधीत असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर लखनौ येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसेच त्यांना रक्तदाब आणि मधुमेहची देखील समस्या होती. कमल राणी वरुण यांच्या निधनाची बातमी समजतात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला आयोधा दौरा रद्द केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com