VIDEO : दोन लष्करी लढाऊ विमानं एकमेकांवर आदळली, ६ जणांचा मृत्यू... थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO : दोन लष्करी लढाऊ विमानं एकमेकांवर आदळली, ६ जणांचा मृत्यू... थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

टेक्सास

अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या डॅलस शहरात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. एअर शोदरम्यान दोन विमानांची आकाशात जोरदार धडक झाली. या दुर्धटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या शोमध्ये ४० हुन अधिक फायटर जेटची समावेश होता. तरी दरम्यान बी १७ आणि पी ६३ ही दोन विमान एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती अमेरीकन हवाई दलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. या क्रॅश दरम्यान बी १७ मध्ये ५ आणि पी ६३ मध्ये १ असा सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

या अपघाताचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हारल होत असुन यांत दोन्ही विमाने वेगाने खाली येण्यापूर्वी हवेत एकमेकांवर आदळताना दिसत आहेत, ज्यामुळे मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे लोट उठले.

या अपघाताचा तपास करण्यासाठी यूएस सरकारी (US Government) तपास एजन्सीने विशेष गो-टीम (Go Team) स्थापन करण्यात आली आहे. ही संपूर्ण टीम घडलेल्या अपघाताचं सखोल परिषण करुन हा अपघात घडण्यामागील नेमक कारण काय ह्याचा छडा लावणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com