Nobel Prize 2021 : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, 'हे' आहेत मानकरी

Nobel Prize 2021 : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, 'हे' आहेत मानकरी

दिल्ली | Delhi

आज वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारच्या मानकर्‍यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा हा प्रतिष्ठित पुरस्कारअमेरीकेतील डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापाउटियन यांना तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्स शोधल्याबद्दल जाहीर करण्यात आला. नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमन यांनी सोमवारी विजेत्यांची नावे जाहीर केली.

मेडिसीनमध्ये हा पुरस्कार गेल्या वर्षी तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला होता. सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार रक्तातील 'हिपॅटायटिस सी' या विषाणूमुळे होतात. या संशोधनासाठी गेल्या वर्षी या कॅटेगरीमध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.