काबूल स्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला; ISIS च्या बालेकिल्ल्यावर 'एअर स्ट्राईक'

काबूल स्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला; ISIS च्या बालेकिल्ल्यावर 'एअर स्ट्राईक'

दिल्ली | Delhi

अफगाणिस्तानमध्ये काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा (Kabul airport attack) अमेरिकेने (US) बदला घेतला आहे. अमेरिकेने (America) इस्लामिक स्टेटच्या (Islamic State in Afghanistan) दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक (Air Strike) केले आहे. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने (Pentagon) दिली आहे.

काबूल विमानतळावर (Kabul AIrport) गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले आहेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये १३ अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळला होता. इस्लामिक स्टेटच्या (Islamic State) खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के (ISIS-K) या संघटनेनं बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. (US carried out drone strike against Islamic State)

अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात (Nangahar Province) ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन सैन्यानं ड्रोनच्या (Drine Strike) मदतीनं आयसिस-केच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं. नांगहार प्रांतात आयसिसचं वर्चस्व आहे. या हल्ल्यात काबूल स्फोटाचा सूत्रधार मारला गेल्याचा अमेरिकेचा दावा आहे. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला इजा झालेली नाही. अमेरिकेचं संरक्षण मंत्रालय (US Department of Defense) असलेल्या पेंटागॉननं हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (President Joe Biden) यांनी हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना याची जबर किंमत मोजायला भाग पाडू असा इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले, की ‘‘ हा हल्ला घडवून आणणारे आणि अमेरिकेला इजा पोचवू पाहणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही. हा हल्ला आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्याची जबर किंमत मोजायला भाग पाडू. आम्ही आमचे हित आणि लोकांचे संरक्षण करू.’’ या दहशतवादी हल्ल्यांमागे ‘इसीस’चा हात असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे. अशाप्रकारचे हल्ले होऊ शकतात याची भीती आम्हाला पूर्वीपासून वाटत होती. गुप्तचरसंस्थांनी तसा इशारा देखील दिला होता.

दरम्यान अमेरिकने पुन्हा एकदा काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली असून लवकरात लवकर येऊन आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अमेरिकनं अफगाणिस्तानमधील स्वत:च्या नागरिकांना विमानतळाच्या प्रवेशद्वारांपासून दूर राहायला सांगितलं आहे. तशी स्पष्ट सूचना अमेरिकन दूतावासानं दिली आहे. याशिवाय अमेरिकन दूतावासानं विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी नियमावलीदेखील जारी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com