युपीएससी : प्रदीप सिंह देशात तर अभिषेक राज्यात पहिला

देशभरातून 829 उमेदवारांची निवड
युपीएससी
युपीएससी

नवी दिल्ली |New Delhi -

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा (यूपीएससी) 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. Union Public Service Commission of India (UPSC) विविध नागरी सेवासाठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 उमेदवार निवडले गेले आहेत. UPSC Civil Services Final Result 2019 या परीक्षेत प्रदीप सिंह देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातून अभिषेक सराफ याने बाजी मारली असून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जतिन किशोर दुसर्‍या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसर्‍या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. UPSC Civil Services Final 2019 result

यूपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवांच्या लेखी परीक्षेच्या निकालांच्या आधारे आणि फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. 829 उमेदवारांची निवड करण्यात आली असून 11 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. official website, upsc.gov.in

महाराष्ट्रातील गुणवंत उमेदवारांमध्ये नेहा भोसले, बीड मंदार पत्की, योगेश पाटील, राहुल चव्हाण, सत्यजित यादव यांचा समावेश आहे.

list of UPSC 2019 toppers

1. Pradeep Singh

2. Jatin Kishore

3. Pratibha Verma

4. Himanshu Jain

5. Jeydev C S

6. Vishakha Yadav

7. Ganesh Kumar Baskar

8. Abhishek Saraf

9. Ravi Jain

10. Sanjita Mohapatra

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com