युपीएससी
युपीएससी
देश-विदेश

युपीएससी परीक्षार्थींना करोना चाचणी बंधनकारक

4 ऑक्टोबरला परीक्षा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

येत्या 4 ऑक्टोबरला युपीएससीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना करोना चाचणी करणेे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना यूपीएससीने काढली असून जे परीक्षार्थी करोना निगेटिव्ह असतील त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. UPSC Civil Services Prelims 2020

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच कोरोनाच्या चाचणीसाठीही धावपळ करावी लागणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह इतर राज्यांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या परीक्षेला बसतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी त्यांना कोरोनाची नियमित तपासणी करुन घेण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यामुळे या परीक्षार्थींना कोरोनाच्या चाचणीचा किमान 2,500 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com