यूपीएससी : मुलाखतीसाठी जाणार्‍या उमेदवारांना विमानभाडे
देश-विदेश

यूपीएससी : मुलाखतीसाठी जाणार्‍या उमेदवारांना विमानभाडे

राहण्याच्या व्यवस्थेसाठीही आयोग मदत करणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi - करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे सुरू नसल्याने, नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाणार्‍या उमेदवारांना येण्या-जाण्याचे विमान भाडे देण्याचा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) union public service commission घेतला आहे. या उमेदवारांच्या राहण्याच्या, वाहतूक व्यवस्थेसाठीही आयोग मदत करणार आहे.

व्यक्तिमत्त्व चाचणीला हजर राहण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रांमधून बाहेर पडण्याची व तेथे जाण्याची परवानगी उमेदवारांना द्यावी अशी विनंती राज्य सरकारांना करण्यात आली आहे, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

करोनाचा फैलाव टाळण्यासाठी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मार्चअखेरीस घेतला, त्यावेळी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2019 साठी 2304 उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी मुलाखती घेण्याच्या बेतात होती.

त्यानंतर उर्वरित 623 उमेदवारांच्या मुलाखती लांबणीवर टाकण्याचे आयोगाने ठरवले, असेही या निवेदनात नमूद केले आहे. 20 ते 30 जुलै या कालावधीत उर्वरित उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्याचे आयोगाने ठरवले असून, याबाबत सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com