UP Election: उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

UP Election: उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेशमध्ये आज निवडणुकीच्या (UP election 2022) मतदानाच्या पाचव्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. यात १२ जिल्ह्यांमधील ६१ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यासाठी ६९२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. (Voting begins in 5th phase)

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, मंत्री सिद्धार्थनाथ सिंह, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा आणि अन्य प्रमुख नेत्यांचे भवितव्य आज मतदार ठरवणार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी रविवारी सकाळी ७ वाजता ६१ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली.

अयोध्या, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौसांबी, प्रयागराज, बाराबाकी, बहराई,इ. अशा १२ जिल्ह्यांतील एकूण ६१ विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. गोंडा, अमेठी आणि रायबरेलीतही मतदार बाहेर पडत असल्याचं चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com