योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट; आयोध्येतील राम मंदिराच्या उध्दाटनाबाबत घेणार महत्वाचा निर्णय

योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट; आयोध्येतील राम मंदिराच्या उध्दाटनाबाबत घेणार महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | New Delhi

आयोध्येत (Ayodhya Ram Mandir) बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराचे जानेवारीमध्ये उध्दाटन करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या उध्दाटनाची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) निवडणार आहे, जेणेकरून उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांची उपस्थिती सुनिश्चित करता येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील साधु-संतांसह सर्व संप्रदायातील संत मुनी उपस्थित राहणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीला जाणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या भेटीत योगी आदित्यनाथ पंतप्रधान मोदी यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण देतील. मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीमध्ये योगी पंतप्रधान मोदींशी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करतील. यासोबतच राम मंदिर लोकार्पणाशी निगडीत तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाऊ शकतो. राम मंदिर उध्दटानाची तारीख लवकरच निश्चित केली जाऊ शकते. पुढील वर्षी १५ ते २४ जानेवारी दरम्यान राम मंदिराचे लोकापर्ण केले जाऊ शकते. तसेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट; आयोध्येतील राम मंदिराच्या उध्दाटनाबाबत घेणार महत्वाचा निर्णय
Maratha Andolan : तेव्हा निर्णय घेण्यासाठी तुमचे हात बांधले होते का?; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे लोकार्पण तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी अनेक प्रकारची अनुष्ठाने सुरू आहेत. वेदमंत्रोच्चारात यज्ञ-याग करून आहुत्यांचा स्वाहाकार केला जात आहे. रामायण तसेच श्रीमद् भागवताचे पठण सुरू आहे. याशिवाय काशी आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी अनुष्ठान सुरू आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय लाखो भाविक राम मंदिर लोकार्पणावेळी उपस्थित राहू शकतील, असा अंदाज आहे. या सर्वांची सोय, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता यावर आतापासूनच भर दिला जात आहे. मंदिर खुले झाल्यानंतरही रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही. भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही. सुमारे ३५ फूट अंतरावरून लोकांना दर्शन घेता होईल. गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com