तिरंगाच्या रंगात रंगला दुबईचा 'बुर्ज खलिफा', पाहा व्हिडिओ

काय आहे कारण?
तिरंगाच्या रंगात रंगला दुबईचा 'बुर्ज खलिफा', पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, करोना महामारी विरूद्ध सुरू असलेल्या लढाईत भारताला समर्थन देण्यासाठी UAE ने जगातील सर्वात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफावर तिरंग्याची अद्भूत विद्युत रोषणाई केली.

तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com