'हायवे'वर उतरले लढाऊ विमान, पाहा व्हिडिओ

'हायवे'वर उतरले लढाऊ विमान, पाहा व्हिडिओ

दिल्ली | Delhi

भारताने गुरुवारी पुन्हा एकदा आपली सुरक्षा क्षमता दाखवली. पाकिस्तान सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या बाडमेरच्या (Barmer in Rajasthan) महामार्गावर ३ किमी लांबीच्या आपत्कालीन फील्ड लँडिंग स्ट्रिपवर (Emergency Landing Field) सुपर हर्क्युलस उतरले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सुपर हरक्यूलिसमध्ये स्वार होते.

राजस्थानच्या (Rajasthan) जालोरमधील (Jalore) बाडमेर हायवेवर (Badmer Highway) गुरुवारी विशेष हवाई पट्टी (Barmer Airstrip) सुरू करण्यात आली आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

हा भारताचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. ज्याचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी केला जाईल. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातील काही महामार्गांचा वापर हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी 'रन वे' म्हणून व्हावा यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हा हवाई रनवे पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर आहे. भारत कोणत्याही आव्हानासाठी नेहमीच तयार असतो हे हवाई रनवेमुळे स्पष्ट होतं आहे. तीन किलोमीटर लांबीचा हा रनवे १९ महिन्यांत तयार करण्यात आला आहे. करोनाच्या काळातही हे काम पूर्ण केले गेले आहे. या आपत्कालीन लँडिंग फील्डच्या बांधकामामुळे मनात उत्साह, सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वासही निर्माण होत असल्यानं आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी विशेष दिवस आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com